नवी दिल्लीः यूजर्स ला अनेक जबरदस्त 4G प्रीपेड प्लान्स ऑफर करीत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोत आता अनलिमिटेड फ्री कॉलिंगसोबत रोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. यातील काही प्लान्स असे आहेत ज्यात वर्षभर वैधता आणि रोज ५ जीबी पर्यंत डेटा मिळतो. वाचाः ९९७ रुपयांचा प्लान बीएसएनएलचा हा प्लान जबरदस्त आहे. ज्या युजर्संना जास्त डेटा आणि कॉलिंग बेनिफिट सोबत मोठी वैधता हवी असेल अशा युजर्संसाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग सोबत रोज २५० फ्री एसएमएस मिळतात. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये १८० दिवसांची वैधता आहे. वाचाः १९९९ रुपयांचा प्लान एका वर्षाची वैधता हवी असलेला प्लान तुम्हाला हवा असेल तर हा प्लान बेस्ट आहे. यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये कॉलिंगसाठी २५० मिनिट आणि १०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात दोन महिन्यांसाठी इरॉज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ५९९ रुपयांचा STV बीएसएनएलचा हा स्पेशल टॅरिफ व्हाउचर आहे.यात रोज ५ जीबी डेटा दिला जातो. तसेच कंपनी या व्हाऊचरमध्ये दररोज कॉलिंगसाठी २५० मिनिट देत आहे. ९० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. कंपनीने या प्लानला वर्क फ्रॉम होम एसटीव्ही म्हणून लाँच केले आहे होते. वाचाः ३६५ रुपयांचा प्लान ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज २५० मिनिटांची फ्री कॉलिंग दिली जाते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. तसेच या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस आणि फ्री कॉलर ट्यून चा फायदा मिळतो. वाचाः १८७ रुपयांचा एसटीव्ही बीएसएनएलचा हा प्लान २८ दिवसांची वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये २५० मिनिट फ्री कॉलिंग आणि डेली २ जीबी डेटा ऑफर केले जाते. बाकी प्लान्सप्रमाणे रोज १०० फ्री एसएमएस मिळते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WYFaFr
Comments
Post a Comment