जिओचे जबरदस्त प्लान, बंपर डेटा आणि अनलिमिटेड कॉल

नवी दिल्लीः ने जून महिन्यात देशातील बाकी टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे. ४ जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. देशाची टॉप ४ जी प्रोव्हाईडर जिओ केड अनेक गटातील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओच्या त्या प्रीपेड प्लानसंबंधी माहिती देत आहोत. या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. जिओच्या २१२१ रुपये आणि १२९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. वाचाः १२९९ रुपयांचा जिओ प्लान रिलायन्स जिओचा १२९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. या पॅकमध्ये एकूण २४ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps च्या स्पीडने डेटा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये कॉलिंग सोबत जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तसेच नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग साठी १२ हजार मिनिट मिळतात. ग्राहकांना एकूण ३६०० फ्री एसएमएसचा फायदा दिला जातो. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री दिले जाते. वाचाः २१२१ रुपयांचा जिओ प्लान जिओचा २१२१ रुपयांचा रिचार्ज पॅकची वैधता ३३६ दिवसांची आहे. या पॅकमध्ये दररोज १.५ जीबी डेटा ऑफर केले जाते. म्हणजेच एकूण ५०४ जीबी डेटा ग्राहकांना दिला जातो. दररोज मिळणारा हाय स्पीड डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps स्पीड मिळते. या पॅकमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट मिळतात. ग्राहकांना दररोज १०० एसएमएस फ्री मिळतात. जिओच्या प्रत्येक प्लानप्रमाणे या प्लानमध्ये सुद्धा जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f0rmR4

Comments

clue frame