नवी दिल्लीः ने आपल्या ६ सर्विसची किंमत अर्धी केली आहे. कंपनीने रविवारी डबल धमाका ऑफर अंतर्गत ६ सर्विस चॅनेलच्या किंमतीत ५० टक्के कमी केली आहे. २६ जुलै रोजी सुरू झालेल्या टाटा स्कायच्या या ऑफरचा फायदा २ ऑगस्ट पर्यंत घेता येवू शकतो. टाटा स्कायने आपल्या ट्विटर हँडलवरून या ऑफर अंतर्गत युजर्संना सिलेक्ट सर्विसेवर डबल Zeetos जिंकण्याची संधी मिळणार आहे. झिटोज स्काय चे एक लॉयल्टी प्रोग्राम आहे. ज्याला युजरला जिंकण्याची संधी आहे. त्यात फ्री टॉयज म्हणून रिडीम करू शकतो. वाचाः या ६ सर्विसेज झाल्या स्वस्त टाटा स्कायचे डबल धमाका ऑफर अंतर्गत ज्या ६ सर्विसेजला स्वस्त करण्यात आले आहे. यात स्मार्ट गेम, फन लर्न, डान्स स्टूडियो, इंग्लिश, वेदिक मॅथ्स आणि फिटनेस याचा समावेश आहे. वाचाः टाटा स्कायची ही सर्विसेज २ ऑगस्ट २०२० पर्यंत ३० रुपयांच्या मंथली शुल्क सोबत उपलब्ध आहे. कंपनी या सर्विसेज साठी दर महिन्याला ६० रुपये चार्ज आकारते. या अडिशनल सर्विसेजसाठी सुरुवातीला पाच दिवसांत कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. वाचाः २ ऑगस्टपर्यंत जिंकू शकता डबल Zeetos टाटा स्काय झिटोज प्रोग्राम अंतर्गत युजर पॉइंट जिंकू शकतात. ज्यात रिमोट कंट्रोल इलेक्ट्रॉनिक हेलिकॉप्टर, हॉटविल कार आणि बार्बी डॉल खरेदी करण्यासाठी रिडीम केले जावू शकतो. टाटा स्कायने म्हटले की, युजर रोज १२०० झिटोज पॉइंट जिंकू शकतात. यासाठी त्यांना क्विज आणि गेम्स यासारखी अॅक्टिविटीज मध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/311VE0M
Comments
Post a Comment