जबरदस्त फीचर्स असलेल्या फोनचा आज सेल, किंमत ७,४९९

नवी दिल्लीः स्मार्टफोनचा भारतात आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होत आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाची अधिकृत वेबसाईटवरून हा फोन खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ड्यूल रियर कॅमेरा यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः किंमत आणि फीचर्स या स्मार्टफोनमध्ये एकच व्हेरियंट येतो. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. फोन दोन कलरमध्ये म्हणजेच रिच ग्रीन आणि रिच ग्रेमध्ये उपलब्ध आहे. ऑफर अंतर्गत फ्लिपकार्ट Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट दिली जाणार आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय ची सुविधा दिली जाणार आहे. वाचाः फोनचे वैशिष्ट्ये ड्यूल सीमच्या रियलमी सी ११ मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो. रियलमी सी ११ फोन अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर चालतो. फोनच्या मागच्या बाजुला दोन कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये एआय ब्यूट, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यासारखे फीचर्स दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी 10W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यात रिव्हर्स चार्जिंग फीचर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3juQKSD

Comments

clue frame