पुणे : विज्ञान प्रसारच्या वतीने आता विज्ञान प्रेमींसाठी 'इंडिया सायन्स' ओटीटी विज्ञान चॅनेलची सुरुवात केली आहे. विज्ञानाच्या विषयी मुलांसह सर्वसामान्य लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने या चॅनलची सुरुवात करण्यात आली आहे. तर याबाबतची माहिती नुकतीच विज्ञान प्रसारद्वारे फेसबूक पोस्ट आणि ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'इंडिया सायन्स' हा एक इन्फोटेनमेंट चॅनेल आहे जो सामान्य लोकांमध्ये जागरूकता आणि विज्ञाना विषयी आकर्षण वाढविण्याचे काम करेल. त्याचबरोबर हे चॅनेल विद्यार्थी, शिक्षक, वैज्ञानिक, संशोधन अभ्यासक, व्यावसायिक तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानात रस असणार्या प्रत्येकासाठी उपयुक्त असून हे इंटरनेट-आधारित टीव्ही चॅनेल आहे. यामध्ये अनुसूचित नाटक तसेच व्हिडिओ-ऑन-डिमांड, अशा विविध प्रकारच्या विज्ञान विषयांवरील चित्रपट आहेत. तसेच हे ऍप स्वरूपात देखील उपलब्द आहे. नागरिकांची वैज्ञानिक मनोवृत्ती वाढविण्यासाठी या अनोख्या चॅनेलला तयार करण्यात आले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
https://youtu.be/Z4jqGxs5cg0 येथे घ्या 'इंडिया सायन्स' ऍप अथवा चॅनेलचा लाभ :
'इंडिया सायन्स' हे ऍप गूगल प्लेस्टोअर वर मोफत उपलब्ध असून रिलायन्स जिओ टीव्ही, रिलायन्स जिओ टीव्ही प्लस, रिलायन्स जिओ सेट टॉप बॉक्स (जिओ स्टोअर), रिलायन्स जिओ चॅट वर हा चॅनेल पाहता येईल. त्याचबरोबर नागरिक www.youtube.com/channel/UCOS_nAtvlg26Qrv7UNC8k
zw, www.facebook.com/indiasciencetv किंवा www.indiascience.in या संकेतस्थळाचा वापर करू शकतील असे विज्ञान प्रसारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
from News Story Feeds https://ift.tt/3ePj6DC
Comments
Post a Comment