Apple Days चा सेल! iPhone पहिल्यांदाच स्वस्तात मिळणार

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉन इंडियावर आज (शुक्रवारी) रात्रीपासून 'Apple Days' सेलचे आयोजन करण्यात येत आहे. 25 जुलैपर्यंत ग्राहकांना या सेलचा लाभ घेता येईल. यात लेटेस्ट आयफोन 11 सीरीज, अ‍ॅपल वॉच, मॅकबुकवर भरघोस सूट मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनने यासंदर्भात माहिती दिली आहे.  या सेलमध्ये iPhone 11 वर 5,400 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ 62,900 रुपयांत iPhone 11 घेणे शक्य होईल.

स्मार्टफोनच्या चार्जिंगची समस्या होणार दूर, फक्त 13 मिनिटात बॅटरी फुल

iPhone 11 ची आतापर्यंतची ही सर्वात कमी किंमत असेल. अ‍ॅपलच्या वेबसाइटवर या फोनच्या किंमती या 68,300 रुपयांपासून सुरु होतात. याशिवाय iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max वर 4 हजार रुपये अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांला याचा लाभ घेता येईल. सेलमध्ये iPhone 8 plus 41,500 रुपयांना खरेदी करणे शक्य होणार आहे. 

हे वाचा - स्वस्तातले स्मार्टफोन! 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 4G मोबाइल

'Apple Days' दरम्यान आयपॅड, Apple वॉच, iPad एक्सेसरीज आणि  मॅक एक्सेसरीज अर्थात कीबोर्ड, केबल्स, पावर अडेप्टर इत्यादीवर देखील सूट उपलब्ध असेल. Apple वॉच सीरीज 3 23,900 रुपयेमध्ये उपलब्ध होईल.  एचडीएफसी कार्डधारकांना यातही 1000 रुपयांची सूट मिळेल. आयपॅड वर 5000 रुपये सूट असून एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Apple मॅकबुक प्रो खरीदीवर 7 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. 



from News Story Feeds https://ift.tt/3eIfLG4

Comments

clue frame