४० हजार रुपयांनी स्वस्त झाला iPhone XS मॅक्स, जाणून घ्या नवी किंमत

नवी दिल्लीः Apple वर बंपर सूट दिली जात आहे. अॅमेझॉनवर अॅपलचा हा प्रसिद्ध ४० हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसोबत उपलब्ध आहे. फोनचा ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, अॅमेझॉनवर आता हा फोन ३६ टक्के सूटवर उपलब्ध आहे. मोबाइलवर सूट दिल्यानंतर या फोनची किंमत कमी होऊन ६९ हजार ९०० रुपये झाली आहे. वाचाः लवकर खरेदी करा आयफोन एक्सएस मॅक्सवर ही ऑफर कधीपर्यंत आहे. याची माहिती समोर आली नाही. त्यामुळे तुम्हाला जर हा फोन खरेदी करायचा असेल तर जास्त वेळ लावू नका. हा फोन तीन कलरमध्ये म्हणजेच, गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे या पर्यायात उपलब्ध आहे. गोल्ड व्हेरियंटवर डिस्काउंट ३६ टक्के डिस्काउंटचा लाभ फोनच्या गोल्ड कलर व्हेरियंटवर दिला जात आहे. फोनचा सिल्वर कलर व्हेरियंट (६४ जीबी) सध्या वेबसाइटवर आउट ऑफ स्टॉक दिसत आहे. तर फोनचा स्पेस ग्रे कलर आता ६८ हजार ९०० रुपयांच्या टॅगसोबत लिस्ट करण्यात आला आहे. वाचाः ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनवर डिस्काउंट नाही या प्रमाणे स्पेस ग्रे कलरच्या ५१२ जीबी स्टोरेजचा फोन १ लाख १९ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. तर आयफोन एक्सएस मॅक्सचा या स्टोरेजचा गोल्ड आणि सिल्वर व्हेरियंटला ओरिजिनल प्राईस म्हणजेच १ लाख ३१ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. फोनमध्ये आहे खास फीचर या फोनमध्ये ६.५ इंचाचा सुपर रेटिना OLED डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ७ मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ कॅमेरा आहे. फोन IP68 रेटिंग सोबत येतो. तसेच २ मीटर पाण्यात टाकल्यास ३० मिनिटापर्यंत हा फोन राहिल्यास याला काहीच होत नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YMBIPH

Comments

clue frame