फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंट

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर () सुरू आहे. हा सेल २३ ते २७ जून पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करीत आहे. याशिवाय, कंपनी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डसोबत १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट देत आहे. जो फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डे सेलचा एका भाग आहे. फ्लिपकार्टवरून एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट देत आहे. या सेलमध्ये हेडफोन्सवर ७० टक्के सूट दिली जात आहे. तसेच गेमिंग, लॅपटॉप, स्मार्टवॉच, स्मार्टफोन्स आणि अन्य डिव्हाईसेजवर सुद्धा ऑफर्स देत आहे. वाचाः ऑनर मॅजिकवर १० हजारांपर्यंत डिस्काउंट या सेलमध्ये ऑनर मॅजिक वॉचवर डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये १० हजार रुपयां पर्यंत डिस्काउंट या वॉचवर दिला जात आहे. या वॉचच्या सिल्वर व्हेरियंट मॅजिकला ७ हजार ९९९ रुपये आणि लावा ब्लॅक व्हेरियंटला ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. मॅजिक वॉच २ वर ४ हजारांचा डिस्काउंट सेलमध्ये या वॉचचा चारकोल ब्लॅक व्हेरियंट ४६एमएम मॅजिक वॉच २ १० हजार ९९९ रुपयात मिळत आहे. फ्लॅक्स ब्राऊन व्हेरियंट १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. 42mm HONOR MagicWatch 2 केवळ १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. वाचाः ऑनर बँड ५ स्वस्तात सेलमध्ये ऑनर बँड ५ (Honor Band 5) स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या बँडवर ९०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये डिस्काउंटनंतर हा बँड २,०९९ रुपयांता खरेदी करता येऊ शकतो. तसेच या सेलमध्ये रियलमी पासून मोटो पर्यंत फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. रियलमी ६ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो. रियलमी ६ मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा दिला आहे. तर मोटो जी ८ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YyFA6V

Comments

clue frame