सॅमसंगचा स्वस्त फोन, बॅटरी काढू शकाल

नवी दिल्लीः सॅमसंगने लेवल स्मार्टफोन Galaxy A01 लाँच केला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजमध्ये सध्या हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. सॅम मोबाइलच्या रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग आता गॅलेक्सी A01 स्मार्टफोनचा स्वस्तातील फोन बनवण्याची तयारी करीत आहे. सॅमसंगचा हा स्वस्तातील फोन रिमूव्हेबल बॅटरी सोबत येणार आहे. म्हणजेच या फोनची बॅटरी काढता येऊ शकते. सॅमसंग या फोनचे नाव गॅलेक्सी A01e ठेऊ शकते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन काही प्रमुख वैशिष्ट्यासह बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर नजरेस पडला आहे. वाचाः नव्या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी सॅमसंगचा हा स्मार्टफोन मॉडल नंबर SM-A013F सोबत गीकबेंच ४ वर दिसला आहे. हा सॅमसंग गॅलेक्सी A01e असू शकतो. सॅमसंगचा स्मार्टफोन Galaxy A01 गेल्यावर्षी SM-A015F मॉडल नंबर सोबत आला होता. गीकबेंच लिस्टिंगमधून हे उघड झाले आहे की सॅमसंग आता रिमूव्हबल बॅटरीचा फोन मध्ये मीडियाटेक MT6739 क्वॉड-कोर प्रोसेसर असणार आहे. गेल्या वर्षी आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी A01 स्मार्टफोनमध्ये 3,000 mAhची बॅटरी देण्यात आली होती. गीकबेंच लिस्टिंगनुसार, गॅलेक्सी A01 नवीन व्हेरियंटमध्ये इतकीच बॅटरी देण्याची शक्यता आहे. १ जीबी रॅम सोबत येऊ शकतो फोन गीकबेंच लिस्टिंगनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A01e स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर बेस्ड One UI सोबत येईल. सॅमसंगचा हा फोन १ जीबी रॅमसोबत येईल. सिंगल कोर टेस्टमध्ये या स्मार्टफोनचा स्कोर ५४२ पॉइंट आहे. मल्टि कोर टेस्टमध्ये या फोनचा स्कोर १४६८ पॉइंटर राहिला. लिस्टिंगमधून कॅमेऱ्याचा सेटअपचा खुलासा करण्यात आला नाही. सॅमसंग गॅलेक्सी ०१ स्मार्टफोनमध्ये रियरमध्ये ड्युल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी फोनमध्ये फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः सॅमसंगने नुकताच भारतात Galaxy A31 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक Helio P65 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f7RD0j

Comments

clue frame