पदार्थाची पाचवी अवस्था अंतराळामध्ये सिद्ध;‘बोस-आइन्स्टाइन कंडेन्सेट’चा अनुभव

पॅरिस - शास्त्रज्ञांना अवकाशात प्रथमच पदार्थाची पाचवी अवस्था आढळून आली आहे. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि थोर भारतीय गणिती सत्येंद्रनाथ बोस यांनी पदार्थाच्या या अवस्थेची कल्पना शंभर वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्या या कल्पनेचे प्रत्यक्षरुप ‘बोस-आइन्स्टाइन कंडेन्सेट’ (बीईसी) शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. या शोधामुळे पुंजवादातील अनेक अनुत्तरीत प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

काही मूलद्रव्यांमधील अणू उणे २७३.१५ अंशाला (ॲब्सोल्यूट झिरो) थंड होतात, त्या स्थितीला ‘बीईसी’ म्हटले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

या तापमानाला सर्व अणू हे पुंजवादाच्या सर्व वैशिष्ट्यांसह एकजीव होतात. यातील प्रत्येक कण तरंगाचेही काम करतो. ही अवस्था म्हणजे गुरुत्वाकर्षणासारख्या बलांचे प्राबल्य असलेले लघुविश्‍व आणि पुंज यांत्रिकीचे प्राबल्य असलेल्या सूक्ष्म विश्‍वातील सीमारेषा मानली जाते. याच ‘बीईसी’ अवस्थेमध्ये विश्‍वाच्या विस्तारामागील अज्ञात उर्जा मानली जाणाऱ्या ‘डार्क एनर्जी’चे गुपित सामावले असल्याचा शास्त्रज्ञांचा विश्‍वास आहे. मात्र, ही अवस्था अत्यंत अस्थिर आणि अल्पकालीन असते. बाह्य जगाचा क्षणकाल संबंध आला तरी पदार्थाची ही अवस्था निघून जाते. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचे प्राबल्य असलेल्या पृथ्वीवर या अवस्थेचा शोध घेणे शास्त्रज्ञांना  अशक्य आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या पथकाने आज आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात केलेल्या प्रयोगाचा निष्कर्ष ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला आहे.  या अवकाशस्थानकात कणांवर पृथ्वीवरील बलांचा प्रभाव नसल्याने अनेक प्रयोग करणे शक्य होते. ‘अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असल्याने कमी बल वापरून आम्हाला अणूंना बांधून ठेवणे शक्य झाले, असे रॉबर्ट थॉम्पसन या  शास्त्रज्ञाने सांगितले. 

पृथ्वीवर ‘बीईसी’ ही पदार्थाची अवस्था अल्पकाळ (काही मिलीसेकंद) टिकते. अवकाशात मात्र ही अवस्था एका सेकंदाहून अधिक काळ टिकत असल्याने शास्त्रज्ञांना निरीक्षण करण्यास वेळ मिळतो.



from News Story Feeds https://ift.tt/3cYdC8m

Comments

clue frame