नवी दिल्लीः () ने स्पेशल प्रमोशनल ऑफर अंतर्गत १५९९ रुपये आणि ८९९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान व्हाऊचर्स ऑफर केले आहेत. नवीन प्लान व्हाऊचर्सला १५०० रुपयांपर्यंत टॉकटाईम आणि २ जीबी डेली डेटा मिळत आहे. नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा दिली जात आहे. तसेच या प्लानची वैधता ४२५ दिवसांची आहे. कंपनीकडून नवीन प्लान केवळ ३१ मे पर्यंत मिळणाऱ्या स्पेशल ऑफर अंतर्गत दिले जात आहेत. वाचाः १५९९ रुपयांचा प्लान समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, १५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान व्हाऊचरमध्ये सेम नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स शिवाय दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा दिला जाणार आहे. याशिवाय, १५०० रुपयांचा टॉकटाईम या प्लानमध्ये दिला जाणार आहे. बीएसएनएल शिवाय अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये युजर्संना २० पैसे प्रति मिनिट चार्ज द्यावा लागणार आहे. तसेच, हा प्लान ४२५ दिवसांची वैधतेसोबत येतो. ८९९ रुपयांचा प्लान दुसऱ्या ८९९ रुपयांच्या प्लानमध्ये बीएसएनएल प्रीपेड प्लान व्हाऊचरमध्ये सेम नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येते. तसेच दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २० पैसे प्रति मिनिट चार्ज लागणार आहे. या प्लानमध्ये १०० रुपयांचा टॉकटाईम व्हॅल्यू मिळतो. तसेच या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. ३१ मे पर्यंत ऑफर च्या रिपोर्टनुसार, हे दोन्ही प्लान केवळ ओडिशा सर्कलमध्ये ऑफर केले जात आहे. बीएसएनएल ओडिशन डिव्हिजनच्या राज्यातील युजर्संना एसएमएस करून या प्लानची माहिती देत आहे. या एसएमएसचा स्क्रीनशॉट रिपोर्टमध्ये शेअर करण्यात आला आहे. कंपनी केवळ ३१ मे पर्यंत युजर्संना या दोन्ही प्लानचे रिचार्ज करण्याचा पर्याय देत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2AqLz3K
Comments
Post a Comment