मोबाईल युजर्संच्या डेटावर संकट, चीनची चाल

नवी दिल्लीः हॅकिंगचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यात जगभरातील कोट्यवधी अँड्रॉयड स्मार्टफोन युजर्संच्या डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. यावेळी हॅकर्स अँड्रॉयड युजर्सला लक्ष्य करण्यासाठी स्पायवेअरचा वापर करण्यात येत आहे. या हॅकिंगमध्ये चीनच्या अॅप डेव्हलपरचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्च टीमने या अॅपला स्पायवेअर असल्याचा दावा केला आहे. या व्हायरसमुळे १० कोटी अँड्रॉयड धोक्यात आले आहेत. वाचाः अॅपमध्ये धोकादायक रिमोट अॅक्सेस ट्रोजन VPNPro च्या रिसर्च टीमने सांगितले की, चिनी अॅपचे डेव्हलपर युजर्संच्या डिव्हाईसमध्ये धोकादायक परमिशन्सची रिक्वेस्ट पाठवतो. तसेच व्हीपीएन प्रो च्या टीमने हेही सांगितले की, या चिनी डेव्हलपरने एका अॅपमध्ये धोकादायक रिमोट ट्रोजन लपवले आहे. याच डेव्हलपरने बनवला होता VivaVideo अॅप हे व्हायरसचे अॅप गुगल प्ले स्टोरवर होता. आणि त्याला चायनीज डेव्हलपरन आणि त्याच्याशी संबंधित दुसऱ्या छोट्या डेव्हलपर्सने तयार केले आहे. हॅकिंगच्या या खेळामध्ये चीनचे अॅप डेव्हलपर QuVideo Inc नाव समोर येत आहे. हा तोच डेव्हलपर आहे. ज्याने प्रसिद्ध व्हिडिओ एडिटिंग अॅप VivaVideo बनवले होते. फ्री असल्याने हा अॅप खूप प्रसिद्ध झाला होता. काही वेळातच याचा डाऊनलोड आकडा १० कोटींपेक्षा जास्त पोहोचला आहे. वाचाः भारत सरकारने केले होते बॅन VivaVideo त्या धोकादायक चिनी अॅप्सप२की एक आहे. ज्याला २०१७ मध्ये भारत सरकारने स्पायवेअर ठरवत त्यावर बंदी घातली होती. QuVideo च्या डेव्हलप करण्यात आलेल्या अॅप अॅपल iOS वरही उपलब्ध आहे. आयओएसवर अॅप परमिशनची दुसरी पॉलिसीला फॉलो करण्यात येते. आयओएसवर हॅकिंग अटॅक होत नाही. रिसर्चर्सने या प्रकारे हॅकिंगने युजर्संला सावध राहण्याचा सल्ला देताना कोणताही अॅपला परवानगी देताना अलर्ट राहावे असे सांगितले आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gyRftk

Comments

clue frame