आता ११ अंकाचा असणार तुमचा मोबाइल नंबर, जाणून घ्या

नवी दिल्लीः आता तुमचा ११ अंकाचा असू शकतो. कारण, () ने शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार देशात ११ अंकाच्या मोबाइल नंबरचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. ट्रायच्या माहितीनुसार, १० अंकाच्या मोबाइल नंबरला ११ अंकाच्या मोबाइल नंबरमध्ये बदलल्यास देशात जास्त नंबर उपलब्ध होऊ शकतात. वाचाः देशात मोबाइल नंबर्सची संख्या १ हजार कोटी होईल ट्रायने आपल्या प्रस्तावमध्ये म्हटले की, मोबाइल नंबरचा पहिला अंक जर ९ ठेवला तर १० ते ११ अंकाच्या मोबाइल नंबरवर स्विच होण्याने देशात एकूण १० बिलियन (१०० कोटी) नंबर्सची क्षमता वाढेल. ट्रायने म्हटले की, ७० टक्के युटिलायझेशन आणि सध्याच्या धोरणानुसार ७०० कोटी कनेक्शन होण्यापर्यंत खूप आहे. वाचाः कॉल करताना नंबरच्या पुढे लावावे लागेल '0' ट्रायने या शिवाय फिक्स्ड लाइन वरून कॉल करताना मोबाइल नंबरच्या पुढे शून्य लावण्याचा पर्याय सूचवला आहे. आता फिक्स्ड लाइन कनेक्शनवरून इंटर सर्विस एरियात मोबाइल कॉल्ससाठी नंबरची सुरुवात शून्य लावायची गरज पडते. तसेच मोबाइल कॉलवरुनही सुरुवातीला शून्य लावणे बंधनकारक झाल्यानंतर लेवेल २, ३, ४, आणि ६ मध्ये सर्व लेवल्सला मोबाइल नंबरचा वापर करता येवू शकतो. नवीन नॅशनल नंबरिंग प्लान याशिवाय, एक नवीन नॅशनल नंबरिंग प्लानची सूचनाही देण्यात आली आहे. याला लवकरात लवकर उपलब्ध करण्यात येईल. तसेच ट्रायने डोंगल्सच्या वापरासाठी होणाऱ्या मोबाइल नंबरला १० अंका ऐवजी १३ अंक करण्याची सूचना केली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gBy8ih

Comments

clue frame