कॅमेरा, नॉच, फिंगरप्रिंटः स्वस्त फोन खरेदी करताना ग्राहकांची कशाला पसंती

नवी दिल्लीः भारतात स्वस्त (budget smartphone) ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बजेट स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक मोबाइलमधील कोणत्या फीचर्सला प्राधान्य देतात? स्मार्टफोन कंपनी आयटेलने यासंदर्भात एक संशोधन केले असून या रिपोर्टमधून माहिती समोर आली आहे. स्वस्तातील फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक AI (आर्टिफिशल इंटेलिजेंस) , कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्रॉप नॉच यासारखे फीचर्स पाहून मोबाइल खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाचाः या रिपोर्टमधून माहिती समोर आली आहे, ३३ टक्के लोक एवन कॅमेरा ग्राहकांसाठी खास फीचर आहे. तर २५ टक्के लोकांना नॉच डिस्प्ले आवडतो. तसेच २२ टक्के लोकांनी फिंगरप्रिंट सेन्सर पाहून फोन खरेदी केला आहे. या रिपोर्टमधून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी वेगवेगळे फीचर्स पाहून फोन खरेदी केला आहे. फिचर्समध्ये ग्राहकांची पसंत ठरलेय, फेव्हरेट अॅप, तसेच वेगवेगळ्या वयातील, ग्रुपमधील आणि धार्मिक ग्राहकांना याचा वापर करण्यासाठी विचारण्यात आले आहे. वाचाः फोनचा सर्वात जास्त वापर? रिपोर्टमध्ये म्हटले की, ५० टक्के भारतीय लोक फोनचा वापर चित्रपट पाहण्यासाठी करीत आहेत. तर २४ टक्के लोक फोनचा वापर न्यूज पाहण्यासाठी करतात. २४ वर्षांच्या वयाची व्यक्ती ८८ टक्के तरुण आपल्या स्मार्टफोनमध्ये चित्रपट पाहतात. यातही स्थानिक भाषेत कंटेट पाहणे जास्त आहे. हा सर्वे ऑनलाइन करण्यात आला होता. ज्यात १३ राज्यांतील ४००० जणांनी सहभाग घेतला होता. यात तरुणापासून धार्मिक आणि वर्किंग सेक्टरमधील लोकांचा समावेश होता. TRANSSION India चे सीईओ अरिजीत तलपत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्टडीतून आम्हाला माहिती झाले की, ग्राहक किती वेगाने अडवॉन्स आणि इनोटिव टेक्नोलॉजीला पसंत करीत आहेत. त्यामुळे भारतीय ग्राहकांना असाच कंटेट उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल, असे ते म्हणाले. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XayiFu

Comments

clue frame