वनप्लस 7T प्रो खरेदीची संधी, ६ हजारांनी स्वस्त

नवी दिल्लीः देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनदरम्यान वनप्लस कंपनीने आपल्या ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. () या स्मार्टफोनच्या किंमतीत ६ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. वनप्लस ७ टी प्रो हेज ब्लू, व्हेरियंट आता ४७ हजार ९९९ रुपयांत अॅमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनची किंमत आधी ५३ हजार ९९९ रुपये होती. वाचाः नवीन किंमतीसह या फोनला अॅमेझॉनशिवाय वनप्लस स्टोरवरून सुद्धा खरेदी करता येऊ शकते. फोनसोबत १२ महिन्यांचे नो कॉस्ट ईएमआयची सुविधा सुद्धा मिळत आहे. वनप्लस ८ सीरिजच्या लॉचिंगवेळी या फोनची किंमत ४७ हजार ९९९ रुपये झाली होती. परंतु, ही किंमत आता कायमस्वरुपी करण्यात आली आहे. वाचाः OnePlus 7T Pro ची वैशिष्ट्ये कंपनीने या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन ३१२०x१४४० पिक्सल आहे. तसेच स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३डी दिला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस चिपसेट दिला आहे. जो एमआयएमओ आणि ५ जी नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच या फोनमध्ये ४ जीबी रॅम सोबत २५६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. वाचाः OnePlus 7T Pro चा कॅमेरा या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १६ मेगापिक्सलचा वाइड लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिला आहे. तसेच एलईडी फ्लॅशचा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ४ के व्हिडिओ शूट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. १६ मेगापिक्सलच्या पॉप अप कॅमेऱ्यावरून जबरदस्त फोटो क्लिक करू शकता. वाचाः OnePlus 7T Pro कनेक्टिविटी कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ ५.०, एनएफसी, यूएसबी टाइप सी आणि जीपीएस यासारखे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये ४०८५ एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ३० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xLjG5B

Comments

clue frame