नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी युजर बेस वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासााठी नवीन प्लान आणले आहेत. एअरटेलने एक मस्त नवीन प्लान आणला आहे. ४०१ रुपयांच्या या प्लानमध्ये Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लानची वैधता एका महिन्याची आहे. ऑनलाइन कंटेट पाहण्यासाठी यात डेटा ऑफर दिला जात आहे. वाचाः ज्या ग्राहकांना दररोज जास्त डेटा वापरायची सवय आहे त्या ग्राहकांसाठी हा प्लान आहे. कंपनीच्या या लेटेस्ट ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. तसेच युजर्संना दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये ३९९ रुपयांची किंमत असलेला Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे सब्सक्रिप्शन एका वर्षापर्यंत फ्री आहे. युजरला एका वर्षात एकदाच रिचार्ज करावे लागेल. युजर्स ४०१ रुपयांच्या प्लानसोबत अन्य दुसरा कोणताही रिचार्ज करू शकतात. हा एक डेटा पॅक आहे. जो युजर्संना व्हाईस कॉल किंवा फ्री एसएमएस साठी दुसऱ्या कॉम्बो प्लानने रिचार्ज करू शकतात. वाचाः ही ऑफर हवी असल्यास थँक्स अॅप किंवा रिचार्ज केल्यानंतर मोबाइल नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करून ही ऑफर अॅक्टिव करू शकतात. एअरटेल थँक्स अॅप युजर्संना खास सुविधा देते. ज्यात आपल्या प्लानमध्ये मिळणाऱ्या सुविधा अॅक्टिव करू शकतात. Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शनचे स्टेटट्स ला हॉट्स्टारच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर चेक करू शकता येते. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y2zgVo
Comments
Post a Comment