'वनप्लस ८' आणि 'वनप्लस ८ प्रो' लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः वनप्लसने अखेर अनेक लिक झाल्यानंतर आपली ८ सीरिज लाँच केली. या सीरिज अंतर्गत कंपनीने आणि हे दोन स्मार्टफोन ऑनलाइन लाँच केले. जगात सध्या करोना व्हायरसचा संसर्ग सुरू असल्याने कंपनीने ऑनलाइन लाँचिंग केली. वनप्लस ८ सीरिज अंतर्गत चीनच्या कंपनीने वनप्लस ७ स्मार्टफोन्सला अपग्रेड केले आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणज या दोन्ही फोनमध्ये ५ जी टेक्नोलॉजी सपोर्ट आहे. वनप्लस डॉट कॉमवर ओपन सेल २९ एप्रिलपासून नॉर्थ अमेरिकेत सुरू होणार आहे. युरोपमध्ये फोनची प्री ऑर्डर सुरू करण्यात आली आहे. भारतात हा फोन कधी लाँच होणार किंवा या फोनची विक्री कधी सुरू होणार याबाबत कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. वाचाः OnePlus 8 Pro किंमत आणि वैशिष्ट्ये कंपनीने लाँचिंगवेळी सांगितले की, वनप्लस ८ प्रोला हातात धरून त्याचा वापर करणे एक वेगळाच फील देणारे ठरणार आहे. कंपनीने मरिटरियल आणि फिनिश या कलरसंबंधी सांगितले. फोनला कर्व्ड ग्लास बॅकला देण्यात आला आहे. वनप्लस ८ अल्ट्रामरीन ब्लू आणि ऑनिक्स ब्लॅक कलर या दोन रंगात आहे. कंपनीने नवीन ग्लेशल ग्रीन कलरही लाँच केला आहे. फोनच्या पुढच्या भागात पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात एका बाजुला फ्रंट कॅमेरा आहे. वनप्लस ८ प्रो मध्ये आयपीएस६८ रेटिंग दिली आहे. म्हणजे या फोनला धुळ किंवा पाण्यापासून काहीही होणार नाही. वनप्लस ८ प्रो मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले, क्यूएचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत येतो. डिस्प्लेत एक कन्फर्ट झोन फीचर आहे. या फोनमध्ये दिलेला सर्वात बेस्ट डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. या डिस्प्लेला मॅटए प्लस सर्टिफिकेट मिळाले आहे. वनपल्स ८ प्रो डिस्प्ले १० बिट कलर डेप्थ सपोर्ट करते. फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ३एक्स टेलिफोटो कॅमेरा व एक कलर फिल्टर कॅमेरा दिला आहे. वाचाः वनप्लस ८ प्रोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्स असल्याने डॉल्बीचा फील येणार आहे. या फोनमध्ये ४५१० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन केवळ ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होऊ शकतो. वनप्लस ८ प्रो कंपनीच्या ऑक्सिजन ओएसवर चालतो. या फोनमध्ये न्यू डार्क थीम, डायनामिक वॉलपेपर, लाइव्ह कॅप्शन यासारखे नवीन फीचर मिळतील. वनप्लस ८ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८९९ डॉलर म्हणजेच ६८ हजार २०० रुपये आहे. तर १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज फोनची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच ७५ हजार ८०० रुपये आहे. वाचाः वनप्लस ८ चे खास फीचर्स व किंमत या फोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. वनप्लसने या फोनमध्ये फ्लूड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी ओआयएस आणि ईआयएस, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक मायक्रो सेन्सर सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजसाठी २५६ चा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये हॅप्टिक व्हायब्रेशन २.० टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. OnePlus 8 ची किंमत व वैशिष्ट्ये वनप्लस ८ च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ६९९ डॉलर म्हणजेच ५३ हजार रुपये, तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७९९ डॉलर म्हणजेच ६० हजार ६०० रुपये वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2wCjkO6

Comments

clue frame