नवी दिल्लीः स्मार्टफोनमध्ये आग लागणे किंवा स्फोट होणे आता नवीन राहिले नाही. परंतु, स्फोट किंवा आग लागल्याचे कारणही एकसारखे नसते. शाओमीचा मध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीच्या बॅगमध्ये हा फोन ठेवला होता. अचानक या फोनला आग लागली व त्याचा स्फोट झाला. ९१ मोबाइलच्या रिपोर्टनुसार, विकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा हा मोबाइल होता. तो गुरुग्राममधील रहिवासी आहे. विकेशच्या मध्ये ९० टक्के बॅटरी होती. अचानक फोन गरम झाला. त्यानंतर फोनला खिशातून बाहेर काढले त्यावेळी फोनमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने तत्काळ फोनला समोर पडलेल्या बॅगेकडे फेकले. त्यानंतर फोनचा स्फोट झाल्याचे विकेशने म्हटले आहे. त्यानंतर विकेशने शाओमीच्या सर्विस सेंटरमध्ये धाव घेतली. सर्विस सेंटरने विकेशलाच दोषी ठरवले आहे. तसेच फोन रिप्लेसमेंट करायचा असेल तर ५० टक्के रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. विकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. गेल्यावर्षी हा फोन खरेदी केल्याचे विकेशने सांगितले. नवीन फोन घेतल्यापासून एकाच चार्जरने फोन चार्ज करीत असल्याचेही विकेशने म्हटले आहे. शाओमीच्या फोनमध्ये याआधीही आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. थर्ड पार्टी चार्जरने फोन चार्ज केल्यास या फोनमध्ये आग लागल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे शाओमीसह अनेक कंपन्या ओरिजनल चार्जरने फोनला चार्ज करण्याचा सल्ला देतात.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QjpLMI
Comments
Post a Comment