नवी दिल्लीः सॅमसंग कंपनीने एम सीरिज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम २० या स्मार्टफोनचा हा फोन अपग्रेडेड व्हर्जन आहे. गॅलेक्सी एम २१ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये ६ जीबी रॅम देण्यत आला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या सॅमसंगच्या या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किमत अद्याप कंपनीने स्पष्ट केली नाही. या फोनची विक्री येत्या २३ मार्चपासून अॅमेझॉन आणि कंपनीची अधिकृत साइटवरून करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम२० या स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९० रुपये आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी पल्स सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. फोनमध्ये गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन दिला आहे. तसेच गॅलेक्सी एम २१ मध्ये Exynos 9611 प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी माली-G72 MP3 GPU दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४जी, वायफाय, जीपीएस, यूएसबी सी पोर्ट, ३.५ एमएमचा हेडफोन जॅक आणि बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमधेय ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनचे वजन १८८ ग्रॅम इतके आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WnbMcA
Comments
Post a Comment