नवी दिल्लीः ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर कार्नवल सेल () कालपासून सुरू करण्यात आला आहे. या सेलमध्ये विवोचे स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. अॅमेझॉनवर हा सेल १६ मार्चपासून सुरू झाला असून हा सेल १९ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये विवो वाय सीरिजच्या स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. विवो वाय सीरिज अंतर्गत , , आणि Vivo Y19 हे स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विवोच्या यू सीरिजवर ३००० रुपये डिस्काउंट विवोच्या U20 चा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी चा स्मार्टफोन १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा फोन ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. विवोचा U10 स्मार्टफोन या सेलमध्ये ८ हजार ९९० रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. विवो S1 सीरिजवर ४००० रुपयांपर्यंत डिस्काउंट या सेलमध्ये विवो एस१ प्रो चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोन्सवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यात १८ हजारर ९९० रुपयांत हा स्मार्टफोन खरेदी करता येवू शकतो. विवो एस१ चा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन या सेलमध्ये १७ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १५ हजार ९९० रुपयात तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १६ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. विवोच्या V17 स्मार्टफोन्सवर ५ हजारांचा डिस्काउंट विवो व्ही १७ या स्मार्टफोनवर या सेलमध्ये ५ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन या सेलमध्ये २२ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. या फोनची खरी किंमत २७ हजार ९९० रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची ही किंमत आहे. डिस्काउंटसह हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकतो. तसेच या फोनवर अतिरिक्त एक्सचेंज ऑफरही मिळवण्याची संधी विवो ग्राहकांना मिळणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d4PXED
Comments
Post a Comment