पॉर्न हबकडून ५० हजार मास्क, फ्री सेवेची घोषणा

नवी दिल्लीः जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये आलेला करोना व्हायरस जवळपास सर्वच देशात पोहोचला आहे. करोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी पावलं उचलली आहेत. देशांच्या मदतीसाठी अनेक जण आता पुढे येत आहेत. सामाजिक संस्था, कंपन्या, व्यक्तींनी आपापल्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे. जग प्रसिद्ध पॉर्न वेबसाइट पॉर्न हबकडून न्यू यॉर्कसाठी ५० हजार सर्जिकल मास्क देण्याची तसेच जगभरातील आपल्या युजर्संसाठी फ्री सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पॉर्न हबने आधी फक्त इटलीतील युजर्संसाठी ही फ्री सेवा सुरू केली होती. परंतु, आता जगभरातील सर्व युजर्ससाठी प्रीमियमची सेवा मोफत केली आहे. जगभरात जवळपास १ अब्ज लोक सध्या लॉकडाऊन आहेत. स्वच्छता राखणे, सतत हात धुत राहणे, हे करणे महत्वाचे आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, लोकांनी जास्तीत जास्त घरातच राहावे यासाठी पॉर्न हबने आपली प्रीमियम सेवा जगभरात मोफत केली आहे, अशी माहिती पॉर्न हबनचे उपाध्यक्ष कोरी प्राईस यांनी दिली आहे. जगभरातील युजर्ससाठी 'स्टे होम हब' हे पेज सुरू करण्यात आले आहे. या पेजवर युजर्संना फ्री व्हिडिओ पाहता येवू शकणार आहेत. मी सेल्फ आयसोलेट राहू शकत नाही. परंतु, मी नेहमी माझे हात धुतो तसेच सोशियल डिस्टंन्स पाळतो, असे कोरी यांनी म्हटले आहे. भारतात पॉर्नहब वेबसाइट ब्लॉक करण्यात आलेली आहे. २०१८ साली उत्तराखंड हायकोर्टाच्या आदेशानुसार ८७५ पॉर्न वेबसाइटवर बंदी घालण्यात आलेली आहे. सामाजिक संस्था, कंपन्या, व्यक्तींनी आपापल्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक प्रसिद्ध पॉर्न वेबसाइट पॉर्न हबकडून न्यू यॉर्कसाठी ५० हजार सर्जिकल मास्क देण्याची तसेच जगभरातील आपल्या युजर्संसाठी फ्री सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पॉर्न हबने आधी फक्त इटलीतील युजर्संसाठी ही फ्री सेवा सुरू केली होती. परंतु, आता जगभरातील सर्व युजर्ससाठी प्रीमियमची सेवा मोफत केली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WG3E7g

Comments

clue frame