सॅमसंग गॅलेक्सी M31 स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्लीः सॅमसंग (Samsung) ने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सॅमसंगने आपल्या या फोनला मेगामॉन्स्टर () म्हटले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये मेगा कॅमेरा, मेगा बॅटरी आणि मेगा डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनचा सेल ५ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. या फोनमध्ये एकूण ५ कॅमेरे देण्यात आले आहेत. पाठीमागे ४ कॅमेरे आणि सेल्फीसाठी फ्रंटला एक कॅमेरा दिला आहे. दोन रंगाच्या पर्यायात स्मार्टफो उपलब्ध दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. ओशन ब्लू आणि स्पेस ब्लॅक या दोन रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये ६.४ इंचाचा इन्फिनिटी U FHD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे वजन १९१ ग्रॅम आहे. या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. Samsung Galaxy M31 हा Android 10 Samsung One UI 2.0 वर आधारित आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. म्हणजेच, फोनच्या बॅकला ४ कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये स्लो मोशल सह ४के व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकता येते. सॅमसंगच्या या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगसह ६,००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या बॅटरीत २९ तास व्हिडिओचा प्लेबॅक, ४९ तासांचा व्हाईस कॉल आणि १३१ तासांचा म्युझीक प्लेबॅक सपोर्ट करीत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एमचा Galaxy M31,हा नवीन फोन आहे. याआधी सॅमसंगने आपल्या या सीरिजमध्ये Galaxy M10, M20, M30, M40, M10s आणि M30s स्मार्टफोन लाँच केले होते. सॅमसंग गॅलेक्सी एम३१ मध्ये 4K व्हिडिओ रिकॉर्डिंग, हायपरलॅप्स, स्लो मोशन आणि सुपर स्टेडी मोड्स सह जबरदस्त व्हिडिओ कॅपबिलिटीज देण्यात आली आहे. लो-लाइट फोटोग्राफीसाठी फोनमध्ये डेडिकेटेड नाइट मोड देण्यात आला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ४ के, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्लो मोशन सेल्फीजला सपोर्ट करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32pdtXR

Comments

clue frame