नवी दिल्लीः ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर () आजपासून सुरू करण्यात आला आहे. ४ दिवस चालणारा हा सेल १३ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये रियलमीच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट आणि ऑफर दिली जात आहे. या सेलमध्ये बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर EMI वरही उपलब्ध होणार आहे. रियलमी 5 प्रो रियलमीच्या या फोनवर या सेलमध्ये ३ हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत आता ११ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. तर ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. रियलमी C2 या सेलमध्ये रियलमीच्या सी२ फोनवर २ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. २ जीबी रॅमचा फोन ५ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर ३ जीबी रॅमचा फोन ६ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. रियलमी X2 प्रो या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये जुना फोन एक्सचेंज केल्यानंतर फोनवर २ हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. रियलमी 3 प्रो फ्लिपकार्टवर या फोनवर ६ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. या फोनमध्ये 4045mAh ची बॅटरी क्षमता आणि २५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमी X ४ जीबी रॅमचा हा फोन १४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी XT या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये या फोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ प्रोसेसर दिला आहे. फोनची 4,000mAh ची बॅटरी क्षमता आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HcecSI
Comments
Post a Comment