हॉट एअर बलून, ATV राईड आणि महाराजा थाळी - अर्जुन कपूर 64MP Samsung Galaxy M31 सोबत जयपूरमध्ये फिरतोय

तुम्ही सोशल मीडियावर आणि विशेषतः इंस्टाग्रामर सक्रिय असाल तर तुम्हाला अर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलविषयी माहिती असेलच. या सिक्रेट डेस्टिनेशनवरुन अर्जुन कपूरने काही फोटो शेअर करुन ठिकाण ओळखण्याचं चॅलेंज दिलं होतं. 64MP #MegaMonster ने काढलेले फोटो अर्जुनने शेअर केले होते. अचूक उत्तर देणाऱ्या ५ लकी चाहत्यांना #MegaMonster Samsung Galaxy M31 मोफत दिला जाणार असल्याचंही अर्जुनने सांगितलं होतं. आता अर्जुन कपूरचे डेस्टिनेशन समोर आलं आहे. जयपूरमध्ये तो हॉट-एअर बलूनचा आनंद घेताना दिसून आला. अर्जुन कपूरने एक इंस्टाग्राम स्टोरी ठेवत चाहत्यांना माहिती दिली होती. त्यानंतर आणखी एक पोस्ट करत त्याचं डेस्टिनेशन उलगडलं. २० फेब्रुवारी २०२० रोजीच अर्जुनने जयपूरच्या प्रवासासाठी पहिली हिंट दिली होती. वाळवंटात ATV रायडिंग करताना तो दिसला होता. चाहत्यांसाठी ही मोठी हिंट होती. कारण, तो राजस्थानमध्ये असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. पण राजस्थानमध्ये नेमका कुठे असेल हा प्रश्न होता. अर्जुनने 64MP Quad Camera सेटअप असलेल्या या फोनमधून काही फोटोही काढले. Samsung Galaxy M31 मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी असल्याचंही अर्जुनने सांगितलं होतं. अर्जुन कपूरने Samsung Galaxy M31 च्या कॅमेरा सेटअपमधून काढलेले अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या लिंकवर करुन तुम्ही ते सर्व एका ठिकाणी पाहू शकता. अर्जुन कपूरने त्याच्या #MegaMonster ट्रायलमध्ये दिलेली आणखी एक हिंट म्हणजे मान सागर लेकवर त्याने महाराजा थाळीची पोस्ट टाकली होती. या पोस्टने आणखी एक गोष्ट दाखवून दिली होती आणि ती म्हणजे Samsung Galaxy M31 च्या Macro mode मध्ये फोटो कसे निघतात तेही यात दिसून आलं. या पोस्टनंतर अर्जुनच्या चाहत्यांना काहीशी पुसटशी कल्पना मिळाली होती की तो कुठे असावा. पण त्याचं अचूक डेस्टिनेशन मात्र ओळखलं नव्हतं. त्याने इतरही काही फोटो पोस्ट केले होते. अर्जुनच्या #MegaMonster ट्रायलवर नजर टाकल्यानंतर आपल्याला पिंक सिटीचे विविध रंग पाहायला मिळतात. मग लेकवरील महाराजा थाळी असो किंवा त्याची एटीव्ही राईड असो. पण या प्रवासात फोनची बॅटरी ही टास्क नव्हती का? अगोदरच्याच पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे Samsung Galaxy M31 मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे. इंटरनेटसाठी २१ तास, टॉकटाईम-व्हॉईस कॉलसाठी ४८ तास, व्हिडीओ प्ले टाइम २६ तास आणि म्युझिकसाठी ११९ तासांचा बॅकअप ही बॅटरी देते. अर्जुनच्या प्रवासातील अखेरची हिंट म्हणजे त्याने टाकलेली इंस्टाग्राम स्टोरी. तुमचं आवडतं फीचर कोणतं आहे, असं त्याने या 64MP कॅमेरातून फोटो काढत चाहत्यांना विचारलं होतं. अर्जुनने पोस्ट केलेले फोटो पाहता Samsung Galaxy M31 च्या कॅमेराची पुरेशी माहिती मिळते. पण फोनला चांगल्या स्क्रीनचीही आवश्यकता असते. या #MegaMonster Samsung Galaxy M31 मध्ये FHD+ sAMOLED Infinity U डिस्प्ले देण्यात आला आहे. अर्जुन कपूरच्या #MegaMonster ट्रायलमधून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे आपणही व्हॅकेशनवर गेल्यानंतर आपलेही फोटो त्याच्यासारखेच सुंदर यायला हवेत. ही गरज Samsung Galaxy M31 चा 64MP कॅमेरा पूर्ण करतो. तुम्हीही प्रवासाची सुरुवात करण्यासाठी कशाची वाट पाहताय? लाँचिंग तारखेची! Samsung Galaxy M31 २५ फेब्रुवारीला १ वाजता अमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाईन स्टोअरसह इतर काही आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्येही लाँच होणार आहे. या फोनची किंमत किती असेल ते अजून रहस्यच आहे. पण किंमत अत्यंत कमी असेल असं बोललं जात आहे. तुम्हीही एका अॅडव्हेंचरसाठी तयार व्हा आणि तुमचा अनुभव #MegaMonster Galaxy M31 मध्ये कैद करा. डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2vbumZX

Comments

clue frame