नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने करावयाची सर्व कार्ये आपण अनेक वेळा आपल्या वैयक्तिक संगणकावर करत असतो. अनेक वेळा ही कार्ये नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणापासून अन्य ठिकाणी किंवा प्रवासामध्ये पार पाडणे जर त्या वेळी लॅपटॉप नसेल तर अवघड होते. अशा वेळी मोबाईलद्वारे आपल्या संगणकाशी जोडले जाऊन कार्य पार पाडणे आपल्याला ‘मायक्रोसॉफ्ट लॉन्चर’ या ‘ॲप’मुळे सहज शक्य झाले आहे. मायक्रोसॉफ्ट लाँचर एक नवीन होम स्क्रीन सुविधा आपल्याला वेगळा अनुभव प्रदान करते, जो आपल्याला आपल्या ॲन्ड्राइड फोन आणि आपल्या पीसी किंवा लॅपटॉपदरम्यान अखंडपणे संक्रमणाची, जोडण्याची व विविध कार्ये करण्याची परवानगी देतो. मायक्रोसॉफ्ट लाँचर आपल्या पीसी किंवा लॅपटॉपवर कागदपत्रे पाहणे किंवा फोटो वा अन्य कार्ये सुरू ठेवणे सुलभ करते, आपल्या सर्व डिव्हाइसवर आपल्याला अधिक उत्पादनक्षम बनवते. मात्र हे सर्व करत असताना आपला पीसी म्हणजेच पर्सनल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप हा‘ विंडोज फॉल क्रिएटर’ या अद्ययावत सॉफ्टवेअरने अपडेट केलेला असणे आवश्यक आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मायक्रोसॉफ्ट लाँचर अत्यंत अनुकूल ॲप आहे,ज्यामुळे आपण आपल्या फोनवर सर्व कामे व्यवस्थित करू शकता. आपले वैयक्तिक तयार केलेले फीड्स, कॅलेंडर पाहणे, याद्या करणे आणि जाता जाता टिपणे घेणे सुलभ करते. जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट लाँचरला आपली नवीन मुख्य स्क्रीन सेट अप करता तेव्हा आपण एकतर आपल्या पसंतीच्या ॲप्ससह नवीन कार्ये जोडणी सुरू करू शकता किंवा आपला वर्तमान ‘होम स्क्रीन लेआउट’ आयात करू शकता. आपल्यास आधीची मुख्य स्क्रीन आपल्याला आवश्यक असल्यास तीसुद्धा प्रवेशयोग्य राहते. आपल्या इतर मायक्रोसॉफ्ट ॲप्ससह वैयक्तिकृत फीड आणि सुधारित कार्यक्षमतेचा आनंद घेण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट लाँचर’ला आपली डीफॉल्ट मुख्य स्क्रीन सेट करणे महत्त्वाचे आहे. एकाच दृष्टिक्षेपात बातम्या, कॅलेंडर कार्यक्रम, कागदपत्रे आणि संपर्क पाहता येतात. मोबाईल व अन्य उपकरणावर आपले वेळापत्रक सहजरीत्या व्यवस्थापित करण्यासाठी आपले कॅलेंडर कार्ड पाहून नियोजन करणे शक्य आहे. आपली मुले त्यांच्या फोनवर किती वेळ घालवतात, हे पहाण्यासाठी आणि त्यांना नकाशावर, घरी किंवा जाता-जाता पाहण्यासाठी कौटुंबिक वैशिष्ट्यांचा वापरही यामध्ये शक्य आहे. मात्र यासाठी मायक्रोसॉफ्टचे समान कौटुंबिक खात्यासह ‘साइन इन’ केलेले मायक्रोसॉफ्टचे कुटुंब खाते आणि ॲन्ड्राइड डिव्हाइस जोडणी आवश्यक आहे.
मायक्रोसॉफ्ट लाँचरच्या युनिव्हर्सल सर्च बारचा वापर करून, आपण एकाच वेळी वेब, आपल्या फायली, ॲप्स, दस्तऐवज आणि संदेश शोधू शकतो. ‘जेश्चर ( Gesture) कस्टमायझेशन’ म्हणजेच कार्ययुक्त हालचाल अनुकूलतेने आपल्याला अनेक गोष्टी सहज साध्य आहेत. आपल्याला आपला फोन लॉक करण्यासाठी ॲप डबल टॅप करू देते. ॲप ड्रॉवरसाठी स्वाइप करूनही कार्य साध्य होते. आपल्या कामाच्या महत्त्वाच्या अनेक फाइल व कागदपत्रे यांची ‘फोल्डर मॅनेजमेंट’ करणे आपल्याला ‘मायक्रोसॉफ्ट लाँचर्स’च्या ॲप ड्रावर या सुविधेमुळे सहज शक्य झाले आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2trlBtS
Comments
Post a Comment