मोटोरोलाचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच होणार

नवी दिल्लीः मोटोरोलाचा सर्वात महागडा फोन आणि पहिला लवकरच भारतात लाँच होणार आहे. Motorola Razr (2019) कडून हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटोरोलाने रेझर २०१९ ला भारतात लाँच करण्यासाठी टीझर लाँच केला आहे. ट्विट करून मोटोरोलाने ही टीझर लाँच केले आहे. मोटोरोलाच्या या फोल्डेबल स्मार्टफोनला गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच करण्यात आले होते. या फोनची विक्री जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. या फोनची टक्कर सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आणि हुवेईच्या मेट एक्ससोबत राहणार आहे. इंडियाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. Motorola Razr (2019) ला लवकरच भारतात लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. परंतु, कंपनीने लाँच करण्याची तारीख अद्याप जाहीर केली नाही. कंपनीने नोव्हेंबरमध्ये याच्या लाँचिंगनंतर भारतीय वेबसाइटवर एक रजिस्ट्रेशन पेज तयार केले होते. या ठिकाणी ग्राहकांना अपडेटेड माहिती मिळू शकत आहे. कंपनी लवकरच हा फोन लाँच करणार असली तरी या फोनच्या किंमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. गेल्या महिन्यात अमेरिकेत करण्यात आलेल्या घोषणेच्या जवळपास या फोनची किंमत असू शकते. अमेरिकेत या फोनची किंमत १,४९९ डॉलर म्हणजेच भारतात या फोनची किंमत १ लाख ६ हजार रुपये असू शकते. तर सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्डची किंमत १ लाख ६४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. Motorola Razr (2019) चे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अनफोल्डेड स्टेट ६.२ इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी एचडी (876x2142 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटमध्ये २.७ इंचाचा (600x800 पिक्सल) क्विक व्ह्यू डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटचा हा क्विक डिस्प्ले सेल्फी कॅप्चर करण्यासाठी, नोटीफिकेशन पाहण्यसााठी आणि म्युझिक नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम सह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेड असताना सेल्फी काढता येऊ शकणार आहे. तर ५ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा डिस्प्ले नॉच देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता २,५१० एमएएच दिली आहे. फास्ट चार्जिंग करण्यासाठी १५ W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YNOI5U

Comments

clue frame