विवोचा ख्रिसमस सेल; स्मार्टफोन्सवर विशेष सूट

नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या विवो कंपनीचा ख्रिसमस सेल सुरू झाला असून, या सेलमध्ये ग्राहकांसाठी विवो स्मार्टफोन खरेदीवर विशेष सूट देण्यात येत आहे. विवो कंपनीचा हा सेल २० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, मोजक्या स्मार्टफोन्सवर एक हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे , बँक ऑफर्स आणि ऑफर्सही ग्राहकांना दिल्या जात आहेत. तसेच आणि बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. V17, Vivo V17 Pro, Vivo V15 Pro, Vivo S1 आणि Vivo Y19 केवळ याच स्मार्टफोन्सवर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. तसेच Vivo Z1 Pro, Vivo Z1x आणि Vivo U20 या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर कंपनीकडून सेल्फी स्टिक दिली जात आहे. हे सर्व स्मार्टफोन कंपनीच्या 'ई-स्टोर'वरून ग्राहक खरेदी करू शकतात. दुसरीकडे, विवोच्या सर्व डिव्हाइसवर १२ महिन्यांसाठी 'नो-कॉस्ट ईएमआय'चा पर्याय कंपनीने दिला आहे. Vivo Z1 Pro आणि Vivo Z1x या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर फ्लॅट एक हजार रुपयांची सूट कंपनीकडून दिली जात आहे. अधिक माहिती विवोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z30Ccl

Comments

clue frame