एक पिलू - १८ हजार वर्षांपूर्वीचे

सैबेरियात सापडलेल्या एका पिलाच्या हिमाच्छादित जीवाश्मामुळे श्वानांबाबतच्या संशोधनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. श्वानांचे पूर्वज कोण होते, त्यांना कधीपासून पाळले जाऊ लागले, या प्रश्नांची उत्तरे कदाचित या संशोधनातून मिळतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

कोणतीही रासायनिक प्रकिया न करता एखाद्या मृत प्राण्याचे शरीर किती दिवस टिकू शकते? किंवा टिकविता येऊ शकते? याचे उत्तर केवळ काही दिवस असे द्यावे लागेल. पण, सैबेरियात तब्बल १८ हजार वर्षे बर्फाखाली गाडले गेलेले एक पिलू सापडले आहे. त्या मृत पिलाचे जवळजवळ संपूर्ण शरीर सुस्थितीत आहे. म्हणजे त्याची त्वचा, केस, पाय, हाडे, संपूर्ण चेहरा, दात सर्वकाही सुस्थितीत आहे. परंतु, हे पिलू कुत्र्याचे आहे की लांडग्याचे याचा शोध शास्त्रज्ञ अद्याप घेत आहेत.  

आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

सैबेरियात सापडलेल्या या पिलाचा मृत्यू ते दोन महिन्यांचे असताना झाला आणि हिमाच्छादनाखाली ते हजारो वर्षे गाडले गेले. शास्त्रज्ञांनी त्याच्या डीएनए नमुन्यांची चाचणी घेतली. इतर प्राण्यांशीही त्याच्या डीएनएची तुलना केली. तरीही ते पिलू कोणत्या जातीचे आहे, हे शोधण्यात यश आले नाही. परंतु, कुत्रा आणि लांडगा यांच्या संकरातून निर्माण झालेले हे पिलू असावे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. कार्बन डेटिंगचा उपयोग करूनही अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने पिलाचे वय किती आहे आणि किती वर्षे ते बर्फाखाली गाडले गेले होते, याचा शोध घेण्यात आला. 

Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश

जनुकांच्या आधारे ते नर पिलू होते हे सिद्ध झाले. पिलीचे नामकरण ‘डोगोर’ असे करण्यात आले आहे. स्थानिक याकुत्सुक भाषेत याचा अर्थ मित्र असा होतो. या पिलाच्या डीएनएचा अनुक्रम तयार करण्याचे काम शास्त्रज्ञांनी सुरू ठेवले आहे. त्यातून या प्रजातीच्या विकासाबाबत माहिती मिळू शकेल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. 

आधुनिक श्वानांचा संबंध लांडग्यांच्या कुळाशी असल्याचे मानले जाते. श्वान पाळीव कधीपासून झाले याबाबत मतमतांतरे आहेत. काही संशोधकांच्या मते श्वानांना पाळण्याची पद्धत २० हजार ते ४० हजार वर्षांपासूनचा आहे. श्वानांना पाळण्याची प्रक्रिया आशिया आणि युरोप अशा दोन खंडांत वेगवेगळ्या वेळी घडली, असाही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्याबाबत या संशोधनामुळे अधिक प्रकाश पडू शकेल. 

पूर्व सैबेरियातील याकुटिया प्रांतातील बेलाया गोरा या भागात हे पिलाचे अवशेष सापडले आहेत. या भागात पूर्वी अनेक प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. त्यात गवा, गेंडा, घोड्याचे तट्टू आणि हिमयुगातील मॅमथचाही समावेश आहे. स्थानिक लोकांनाच बर्फाखाली पिलू गाडले गेल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती याकुत्सुक नॉर्थ ईस्टर्न फेडरल युनिव्हर्सिटीला कळविली. या विद्यापीठातील संशोधकांनी या पिलाचे अवशेष बर्फातून बाहेर काढले व ते नॉर्दन वर्ल्ड म्युझियमध्ये ठेवण्यात आले आहेत. या संग्रहालयाचे संचालक निकोलाय अँड्रोसोव्ह यांनीच हिमाच्छादनाखाली पिलू सापडल्याची माहिती जगजाहीर केली. याकुटिया प्रांतात यापूर्वीही अनेक प्राणी सापडले आहेत. हा भाग खनिज तेल व वायू आणि हिऱ्यांच्या खाणींनी समृद्ध आहे. नव्याने सापडलेल्या पिलाची काही हाडे स्वीडनमधील पेलिओजेनेटिक्स या संस्थेत चाचण्यांसाठी पाठविण्यात आली आहेत. उर्वरित शरीर रशियातच जतन करण्यात आले आहे.  स्वीडनमधील सेंटर फॉर पेलिओजेनेटिक्स या संस्थेतील संशोधक डेव्ह स्टेनटन याबाबत म्हणाले, ‘‘श्वान आणि लांडग्यांप्रमाणे पूर्वज असलेली ही प्रजाती असल्याचे डीएनएचा अनुक्रम लावण्यात आल्यामुळे स्पष्ट झाले. मात्र, हे पिलू श्वानाचे आहे की लांडग्याचे हे अद्याप निश्चित होऊ शकेलेले नाही.’’

मेलेल्या पिलाला इतर प्राण्यांनी खाण्यापूर्वीच ते बर्फाखाली गाडले गेले असावे, असाही अंदाज स्टेनटन यांनी व्यक्त केला आहे.  श्वानासारख्या प्राण्याची सर्वांत जुनी कवटीही रशियात २०११मध्ये सापडली होती. ती ३३ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे अभ्यासातून दिसून आले होते.

News Item ID: 
599-news_story-1576254519
Mobile Device Headline: 
एक पिलू - १८ हजार वर्षांपूर्वीचे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
article surendra pataskar
Author Type: 
External Author
सुरेंद्र पाटसकर
Search Functional Tags: 
कुत्रा, डीएनए, लांडगा, विकास, संग्रहालय, पर्यावरण
Twitter Publish: 
Meta Description: 
कोणतीही रासायनिक प्रकिया न करता एखाद्या मृत प्राण्याचे शरीर किती दिवस टिकू शकते? किंवा टिकविता येऊ शकते? याचे उत्तर केवळ काही दिवस असे द्यावे लागेल.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2YLDuik

Comments

clue frame