ट्विटरचाही डेटा लीक, अॅप अपडेट करण्याची सूचना

नवी दिल्लीः इंटरनेट युजर्ससाठी चिंता वाढवणारी ही बातमी. आपल्या अॅपमध्ये काही मॉलिशस कोड इंजेक्ट केले गेले होते, अशी कबुली ट्विटरने दिलीय. या कोडच्या मदतीने युजर्सची वैयक्तीक माहिती मिळवता येऊ शकत होती आणि भारतासह जगभरातील ट्विटरच्या अनेक युजर्सच्या अकांउवर याचा परिणाम दिसून आला होता. गेल्या शुक्रवारी हा प्रकार घडला. यामुळे ट्विटरने आता युजर्सना मेल पाठवून अँड्रॉइड अॅप तात्काळ अपडेट करण्याची सूचना केलीय. हॅकर्सना अँड्रॉइड अॅपच्या मदतीने नॉन पब्लिक अकाउंट्सशी संबंधित माहिती मिळवू शकत होते. तसंच युजर्सच्या अकाउंटवर ताबा मिळवून ते थेट मेसेजही पाठवू शकत होते. कॉम्प्लिकेटेड प्रोसेसच्या मदतीने अॅपमध्ये मॉलिशस कोड टाकता येत होते. यामुळे माहिती युजर्सची मिळवता येत होती. पण ही समस्या आता दूर करण्यात आली आहे, असं ट्विटरने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलंय.

Search Results

Web results

ट्विटरने दिला इशारा मॉलिशस कोड टाकून डेटा चोरीचे आणि त्याचे काही पुरावे मिळाल्याचं कंपनीने कुठेही स्पष्ट केलेलं नाही. तसंच किती युजर्सना फटका बसलाय, याची माहितीही दिली नाहीए. अॅपमधील त्रुटी दूर करण्यात आली आहे. तसंच युजर्सना इमेलद्वारे नोटिफिकेशन्स देऊन त्यांना अॅप अपडेट करण्याची सूचना दिलीय, अशं कंपनीने म्हटलंय. अशी समोर आली त्रुटी अॅपमधील त्रुटी फटका कुठल्याही iOS वेब युजर्सना बसलेला नाही. पण एका भारतीय युजर्सला गुगलकडून मोबाइल आणि डेस्कटॉप डेटा लीक होण्याचा इशारा मिळाल होता. गुगल क्रोमवर काही वेबसाइट उघडल्यावर युजरला सेक्युरिटी वॉर्निंग मिळाली. यानंतर याची माहिती देण्यात आली होती.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36T5lzY

Comments

clue frame