ट्वीटरचा इशारा, बंद होणार अनेक अकाउंट्स

नवी दिल्लीः ने आपल्या पोर्टलवरून अनेक अकाउंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साइन इन न केलेले अकाउंट्स बंद करणार आहे. या सोबतच इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारा ई-मेलही ट्वीटरकडून पाठवण्यात येत आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत साइन इन न केल्यास ते त्यांचे अकाउंट बंद केले जाईल. बंद केलेल्या अकाउंटचे 'युजर नेम' दुसऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. युजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर आहे. यानुसार इनअॅक्टिव्ह युजर्सचे अकाउंट्स बंद करण्यावर काम सुरू आहे. यामुळे युजर्सना अचूक, विश्वासार्ह माहिती मिळेल आणि ट्वीटरवरील त्यांचा विश्वास वाढेल, असं ट्वीटरच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. ट्वीटरचे वॉर्निंग मेल सुरू, पण कालावधी निश्चित नाही ट्वीटरने इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारे ईमेल पाठवण्यास सुरुवात केलीय. पण हे ती अकाउंट बंद करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. अकाउंट्स बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असं ट्वीटरने म्हटलंय. अनेक अकाउंट्सची माहिती मिळवली गेल्या सहा महिन्यांपासून लॉग-इन न केलेल्या अनेक अकाउंट्सची माहिती मिळवली आहे. अकाउंट बंद करण्यापूर्वी अशा युजर्सना मेल पाठवून कळवण्यात येणार आहे. २०२० मध्ये ट्वीटर आणणार नवीन फिचर्स युजर्सच्या सुविधेसाठी ट्वीटर २०२०मध्ये नवीन फिचर्स आणणार आहे. यादृष्टीने ट्वीटरचे काम सुरू आहे. 'रिट्वीट' आणि 'मेन्शन्स'वरील फिचर्स आणखी विकसित केले जाणार आहेत. ट्वीट कुणी रिट्वीट केल्यास आणि मेन्शन्स डिसेबल करण्याचे फिचर्स आणण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सोशल मीडियावरील छळाला आळा घालता येऊ शकेल, असं ट्वीटरचं म्हणणं आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2DnzsCQ

Comments

clue frame