पाच पॉप-अप कॅमेरे, लवकरच शाओमीचा फोल्डेबल फोन

नवी दिल्ली : सॅमसंग गॅलक्सी फोल्ड ते हुवावे मेट एक्स पर्यंत २०१९ या वर्षात अनेक पाहायला मिळाले. गॅलक्सी फोल्ड नुकताच भारतात लाँच झाला, तर हुवावे मेट एक्स भारतीय बाजारात कधी येणार त्याची उत्सुकता कायम आहे. सॅमसंग आणि हुवावेने फोल्डेबल फोन आणल्यानंतर शाओमीही त्यात मागे नाही. शाओमीने नुकताच प्रोटोटाइप फोल्डेबल फोनचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या फोनशी संबंधित काही माहितीही समोर आली आहे. वाचा : शाओमीने चीनमध्ये नुकताच पाच रिअर कॅमेऱ्यांचा Mi CC9 Pro हा फोन लाँच केला. आता पेंटा (पाच कॅमेरे) टेक्निकचा वापर फोल्डेबल फोनमध्येही करणार आहे. काही वृत्तांनुसार, शाओमीने फोल्डेबल फोनमध्ये पॉप अप कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन कधी लाँच होईल याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र येत्या काही महिन्यात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. वाचा : Tigermobiles या वेबसाइटने शाओमीच्या फोल्डेबल फोनचा डिझाइन पेटंट फोटोही जारी केला आहे. यामध्ये पाच पॉप अप कॅमेरा सेन्सर्स दिसून येत आहेत. हा कॅमेरा सेटअप फ्रंट आणि रिअर या दोन्हीसाठी काम करणार असल्याचंही यामधून दिसत आहे. फोन अनफोल्ड केल्यास पॉप अप कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला दिसतो. काही वृत्तांनुसार, शाओमीचा हा नवा फोन ७४ हजार रुपये किंमतीच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो. Samsung Galaxy Fold ची किंमत जवळपास १ लाख ४० हजार रुपये आहे, तर Huawei Mate X ची किंमत १ लाख ८५ हजार रुपयांपर्यंत असू शकते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KaicVL

Comments

clue frame