मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.
मागील बाजूस तब्बल चार कॅमेरे असणा-या या फोनमधील एक कॅमेरा तर तब्बल 64 मेगापिक्सलचा आहे. त्यामुळे तुम्ही यातील फोटोची क्लियारीटी किती भन्नाट असेल याचा विचार करु शकता. 64 मेगापिक्सलसह इतर कॅमेरे हे 8, 2 आणि 2 मेगापिक्सलचे आहेत.
कॅमे-यासह या फोनमध्ये स्टोरेज देखील जास्त देण्यात आले असून तीन प्रकारांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज, 6GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 64GB स्टोरेज असे प्रकार देण्यात आले आहेत. याशिवाय 4500 मिली अँपियरची बॅटरी देखील या फोनला देण्यात आली आहे. तसेच हा फोन सर्वात लेटेस्ट अशा अँडरॅाईड 9 पीआय वर आधारीत आहे.
इथे विकत मिळेल फोन
दरम्यान हा फोन नुकताच भारतात लाँच झाला असल्याने दुकानांमध्ये हा फोन अजून उपलब्ध नाही आहे. त्यामुळे अॅमेझॉन या अॅानलाईन संकेतस्थळावर हा मोबाईल २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुरु होणा-या सेलमध्ये विकत घेता येणार आहे. या फोनच्या विक्रीसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2IS0ky4
Comments
Post a Comment