पावरफुल्ल बॅटरीवाला सॅमसंग M30s लाँच

नवी दिल्लीः एम३०एस आज भारतात लाँच झाला आहे. याच वर्षी भारतात लाँच झालेल्या एम सिरीजचा गॅलक्सी ए३०चा अपडेटेड वर्जन आहे. फोन लाँच होण्याआधी कंपनीनं या फोनच्या फिचरबाबत माहिती जाहीर केली होती. गॅलक्सी एम३०एसचं खास वैशिष्ट्य म्हणजे ६,०००एमएच क्षमतेची बॅटरी तसंच, कंपनीनं स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस ९६११ एसओसी प्रोसेसर दिला आहे. सॅमसंग गॅलक्सी एम३०एस आज दुपारी बारा वाजता लाँच झाला आहे. किंमत कंपनी हा फोन ४ जीबी+६४ जीबी वेरियंटची किंमत १३,९९९ आहे आणि ६जीबी+१२८ जीबी १६,९९९ रुपये असून युजर्स अॅमझॉनवर फोन खरेदी करु शकतात. फिचर ६,००० एमएच क्षमतेची बॅटरी असणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ६.४ इंचाच अमॉल्ड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. फॉटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून यात ४८ मेगापिक्सल प्रयमरी कॅमेरासोबत ५ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि एक ८ मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्स दिली आहे. सेल्फी साठी २४ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30rVI7Q

Comments

clue frame