नवी दिल्ली: स्मार्टफोनची निर्मिती करणारी कंपनी उद्या भारतात आपला पहिला स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. हा टीव्ही भारतात फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. या टीव्हीत मोठे साउंड बार देण्यात आले आहेत. ३० डब्ल्यू फ्रंट फायरिंग स्पीकर्स आहेत. टीव्हीचा स्क्रीन टू बॉडी रेशियो खूपच चांगला आहे. रिपोर्टनुसार, मोटोरोला स्मार्ट टीव्हीमध्ये खालच्या बाजूला एक साउंड बार देण्यात आला आहे. त्यामुळं हा टीव्ही घेणाऱ्याला होम थिएटरचा अनुभव मिळेल. या टीव्हीबाबत सविस्तर माहिती उद्या लाँचिंगच्या सोहळ्यात मिळणार आहे. स्मार्टफोनही होणार लाँच आयएफए २०१९मध्ये मोटोरोलाने मोटो ६ ई प्लस स्मार्टफोनची घोषणा केली आहे. मोटोरोलानं आपल्या ट्विटर हँडलवरून या स्मार्टफोनचा टीझर पोस्ट केला होता. फ्लिपकार्टनंही या स्मार्टफोनचा एक फोटो पोस्ट करून तो ऑनलाइन खरेदी करता येईल यावर शिक्कामोर्तब केलं होतं. फीचर्स जाणून घ्या मोटो ई ६ प्लस स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ६.१ इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले, ड्युएल कॅमेरा सेटअप, ६.१ इंच एचडी प्लस मॅक्स व्हिजन आयपीएस डिस्प्ले, आस्पेक्ट रेशियो १९:५:९ आहे. ऑक्टा कोर मीडिया टेक हिलियो पी २२ प्रोसेसर असून, ३००० एमएएच बॅटरी आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/301BPbn
Comments
Post a Comment