मुंबई: चीनची कंपनी रिअलमीने भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन आणि लाँच केले आहेत. Realme 5 Pro आणि Realme 5 या दोन्ही फोनच्या मागच्या बाजूस चार कॅमेरे आहेत. Realme 5 Pro च्या मागे ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. Realme 5 Pro या फोनची किंमत १३,९९९ रुपयांपासून सुरू होते. ही किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची आहे. Realme 5 Pro च्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १६,९९९ रुपये आहे. Realme 5 या फोनची किंमत ९,९९९ (३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज) रुपयांपासून सुरू होते. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजवाल्या ची किंमत १०,९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजवाल्या फोनची किंमत११,९९९ रुपये आहे. Realme 5 Pro चे फोन ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून के फोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. ५ चा सेल २७ ऑगस्टपासून दुपारी १२ वाजल्यानंतर सुरू होईल. दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZfGiqI
Comments
Post a Comment