नवी दिल्लीः कार्ड क्लोनिंग करून एटीएम मशिनमधून पैसे काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम कार्ड न वापरता आता एटीएममधून पैसे काढु शकता. अनेक बँक ग्राहकांसाठी हे उपाय उपलब्ध करून देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो अॅपनं अलीकडेच ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. असे काढा पैसे एसबीआय योनो स्टेट बँकचं अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही एटीएम कार्डचा वापर न करताही पैसे काढु शकता. एसबीआय अॅपमध्ये नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर तुम्हाला अॅपचा वापर करायचा नसेल तर तुम्ही वेबसाइटची मदत घेऊ शकता. १) सहा अंकी कॅश पिन योनो अॅपमध्ये टाका २) त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ६ आकडी क्रमांक येईल तो क्रमांक तुमच्या जवळच्या एसबीआय एटीएममध्ये टाका ३) ३० मिनिटांपर्यंत तुम्ही तो क्रमांक वैध असणार आहे. कितीपर्यंत काढु शकता पैसे एटीएम कार्ड न वापरता तुम्ही एसबीआयच्या माध्यमातून कमीत कमी ५०० ते १०,००० रुपये काढु शकता. तर दिवसभरात २०, ००० पर्यंत कॅश काढु शकता. एसबीआयमध्ये १६, ५०० एटीएममध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MBofEJ
Comments
Post a Comment