रिअलमी ३आयचा आज सेल; 'ही' आहे खास ऑफर

मुंबईःचायनीज स्मार्टफोन '' हा बजेट फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आज चांगली संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग साईट आणि रिअलमीच्या वेबसाइटवर या मोबाइलचा फ्लॅशसेल दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरू होणार आहे. सेलदरम्यान या स्मार्टफोनवर ग्राहकांना बेस्ट ऑफर मिळणार आहे. 'रिअलमी ३आय'ची वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये ड्यूएल रिअर कॅमेरा सेटअप आणि रिअर फिंगरप्रिंट सेन्सरसोबत ४२३० क्षमतेची बॅटरी लाइफ आहे. 'रिअलमी ३आय'वर ऑफर्स आणि किंमत भारतात 'रिअलमी ३आय'चा ३ जीबी रॅम आणि ३२ जीवी वेरियंटची किंमत ७,९९९ रुपये आहे. तर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या वेरियंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. ब्लॅक, ब्लू आणि रेड रंगाच्या पर्याय उपलब्ध आहेत. एकदा का स्मार्टफोन फुल्ल चार्ज केल्यास युजर्स ११ तास सलग पबजी खेळु शकतात तसंच १३ तासांपर्यंत यूट्यूब व्हिडिओ पाहू शकतात. असा दावा कंपनीनं केला आहे. फ्लिपकार्टवरून फोन खरेदी केल्यास फोनवर नो-कॉस्ट इएमआय, अॅक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड आणि एचडीएफएसच्या डेबिट कार्डवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशबँक मिळणार आहे. तर, रिअलमीच्या वेबसाइटवरून फोन खरेदी करताना मोबिक्विक अॅपचा वापर केल्यास ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. तसंच, या सेलमध्ये ५,३००रुपयांपर्यंतचा जिओ बेनिफिटची ऑफरही ग्राहकांना मिळणार आहे. ची वैशिष्ट्ये >> ६.२२ इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले >> ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज >> पी६० एसओसी प्रोसेसर >> ४८ मेगापिक्सल प्लस ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा >> सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2H5W7G1

Comments

clue frame