मुंबई मेसेंजर सर्वाधिक लोकप्रिय असणारे अॅप आहे. चॅटिंग शिवाय फोटो, व्हिडिओ शेअरिंगसाठी या अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. व्हॉट्स अॅपवरून मेसेज पाठवण्याआधी संबंधित व्यक्तिचा नंबर सेव्ह करावा लागतो. मात्र, नंबर सेव्ह न करताही एखाद्याला मेसेज पाठवता येणे शक्य आहे. अनेकदा व्हॉट्स अॅपवरून जो नंबर सेव्ह नाही ,त्या नंबरवर फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज पाठवावा लागतो. नंबर सेव्ह केल्याशिवाय मेसेज पाठवता येत नाही. नंबर सेव्ह न करताही व्हॉट्स अॅप मेसेज पाठवता येणार आहे. त्यासाठी तुम्ही डेस्कटॉपचाही वापर करू शकता. वेब ब्राउजर सुरू करा सर्वात पहिल्यांदा फोन किंवा डेस्कटॉप वेब ब्राउजर सुरू करा. त्या ठिकाणी ही लिंक पेस्ट करा ‘https://ift.tt/2lVX7mK’ (लक्षात ठेवा X असलेल्या ठिकाणी तुम्हाला देशाचा कोड (९१) सह फोन क्रमांक नमूद करायचा आहे) उदाहरणार्थ, जर तुम्हाला १२३४५६७८९० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. तर ब्राउजरमध्ये https://ift.tt/2Y31kcx असा युआरएल लिहावा लागणार. इथे आम्ही फोन क्रमांकाआधी भारतासाठी असलेला कंट्री कोड ९१ हा नमूद केला आहे. या लिंकला ब्राउजरमध्ये नमूद केल्यानंतर enter करा. त्यानंतर एक चॅट बॉक्स सुरू होईल. इथे मेसेज बटणवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही नंबर सेव्ह न करताही त्या नंबरवर मेसेज पाठवू शकता. अन्य चॅट प्रमाणे हा देखील सुरक्षित पर्याय असणार आहे. लक्षात ठेवायाचा वापर एका वेळी एकाच युजर्ससोबत चॅट करता येऊ शकतो. त्याशिवाय ज्या नंबरवर तुम्ही व्हॉट्स अॅप पाठवणार आहात, त्या फोन क्रमांकावरही व्हॉट्स अॅप सुरू असले पाहिजे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JX3mAO
Comments
Post a Comment