पासवर्ड चोरी ओळखतं गुगलचं 'हे' टूल

मुंबई : सॉफ्टवेअरमधील सुरक्षा तंत्रज्ञात गडबड करून यूजर्सचा डाटा हॅक करण्याच्या प्रकारात मध्यंतरी प्रचंड वाढ झाली होती. हॅक केलेल्या डाटामध्ये पासवर्ड आणि यूजर नेम याशिवाय यूजरच्या खासगी माहितीचाही समावेश होता. यानंतर यूजरने वेळोवेळी आपला पासवर्ड बदलत राहीलं पाहीजे, असं सूचना कमी आवाहन गुगल कडून केलं जातं होतं. हे आवाहन सर्व यूजर्सना केलं जात असंल तरी सुरक्षा तंत्रज्ञात गडबड केल्याने सर्व यूजर्सचा पासवर्ड आणि खासगी माहिती हॅक होते असं नाही. अशात, झाला आहे की नाही हे यूजरला कळाणार कसं? आनंदाची बाब अशी की '' या गुगलने तयार केलेल्या नव्या टूलवरून पासवर्ड हॅक केला आहे की नाही, याची माहिती यूजरला मिळवता येते. हे टूल गुगल क्रोमच्या नव्या व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे. कसं वापरावं? हे टूल वापरण्यासाठी इंटरनेटची गरज पडते. गुगल क्रोममध्ये उपलब्ध असलेल्या गुगल स्टोरवरून 'पासवर्ड चेकअप 'डाऊनलोड केल्यावर 'अॅड टू क्रोम' हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतरच हे टूल वापरता येणं शक्य होतं. 'असं' करतं काम गुगल क्रोमवर पासवर्ड चेकअप एकदा 'अॅड' केलं की गुगलवरील चालू अकाउंट आपोआप मॉनिटर होऊ लागतं. यानंतर सुरक्षा तंत्रज्ञानात काहीही गडबड झाली किंवा पासवर्ड लिक झाल्याचं या टूलच्या निदर्शनास आलं, तर लगेचंच लाल रंगाच्या बॉक्समध्ये त्याविषयी सूचना येते. या सूचनेत पासवर्ड बदलण्यास सांगितलं जातं आणि जोपर्यंत अकाउंटचा पासवर्ड बदलला जात नाही, तोपर्यंत हा लाल बॉक्स स्क्रिनवर येत राहतो. पासवर्ड पुन्हा सुरक्षित झाल्यावर बॉक्स हिरव्या रंगात बदलतो. पासवर्ड बदलण्याची पद्धत इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच गुगलचा पासवर्ड कसा बदलायचा याची कल्पना असते. पण पासवर्ड चेकअपमध्ये ही पद्धत बदलते. सूचना देणाऱ्या लाल बॉक्सवर 'लर्न मोर' असा पर्याय दिलेला असतो. यावर क्लिक केल्यावर वेबसाइच्या सपोर्ट पेजवर यूजरला जाता येतं. येथून पासवर्ड बदलला येतो. यामुळे पासवर्ड बदलण्याची क्रिया सोपी होते.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xdJhAi

Comments

clue frame