अॅपलच्या डिव्हाइड कॉन्फरेन्समध्ये अनेक सॉफ्टवेअर अपडेट झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वात महत्त्वाचं फिचर असेलेल्या 'मॅप्स' या अॅपमध्येही अॅपलनं अनेक बदल केले आहेत. आतापर्यंत अॅपल युजर्सदेखील गुगल मॅपची मदत घेताना दिसून येतात. परंतू काल अपडेट करण्यात आलेल्या अॅपल मॅप्सची गुगल अॅप्सला चांगलीच टक्कर मिळेल असं दिसून येत आहे. खरं तर अनेक फिचर्स मुळं गूगल मॅप हे अॅप अधिक युजर फ्रेंडली आहे. परंतू अॅपल ग्राहकांना गूगल मॅपचा वापर करण्यापासून रोकण्यासाठी अॅपलनं अपडेटेड अॅपल मॅप्स लॉन्च केलं आहे. WWDC २०१९ च्या दरम्यान आयफोनसाठी अॅपलनं आयओएस १३ सॉफ्टवेअरची घोषणा केली. यात अॅपल मॅप्सचे बदललेलं रुप दिसत आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2JUtJda
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2JUtJda
Comments
Post a Comment